नागपूर शहर: अंजुमन कॉलेजजवळ अमली पदार्थ तस्करी; गुन्हे शाखेची दोघांना अटक: शुभांगी देशमुख पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 2 जुलैला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखा युनिट-२ ने सापळा रचून झोहेब शाहबाज कुरेशी आणि सचिन विश्वकर्मा या दोन अमली पदार्थ तस्करांना अटक केली. आरोपींजवळून ३० हजार रुपये किमतीचे ५.०३० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. हे दोघे गेल्या ८ महिन्यांपासून अमली पदार्थांची विक्री करत असून, 'गुप्ता' नावाच्या मुख्य सप्लायरकडून ते माल घेत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.