काटोल: कोंढाळी नगरपंचायत मध्ये 70.85% मतदान ; 17 ऐवजी 15 प्रभागांसाठी झाली निवडणूक
Katol, Nagpur | Dec 2, 2025 दोन डिसेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, आज कोंढाळी नगरपालिका च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत 70.85% इतके उत्साह पूर्ण मतदान झाले. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अत्यंत शांततेत मतदान पार पडले यामध्ये 1186 एकूण मतदारांपैकी 7855 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान येथे 17 प्रभागा ऐवजी 15 प्रभागांमध्ये निवडणूक झाली आहे उर्वरित दोन प्रभागाची निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार आहे आणि या सर्व जागांचा निकाल 21 डिसेंबर रोजी घोषित करण्यात येणार आहे.