नागपूर शहर: गिट्टीखदान पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: ८० हरवलेले मोबाईल शोधून मालकांच्या स्वाधीन: तोडासे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांनी 20 जूनला सायंकाळी 6:00 वाजता दिलेल्या माहितीनुसारगिट्टीखदान पोलिसांनी एका विशेष मोहिमेअंतर्गत हरवलेल्या ८० मोबाईलची यशस्वी शोध मोहीम राबवली आहे. तब्बल १५ लाख ३० हजार रुपये किमतीचे हे मोबाईल पोलिसांनी शोधून काढले असून, ते आज कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांनी दिली आहे.