यावल: नायगाव शेत शिवारातून अज्ञात चोरट्यांनी शेती साहित्याची केली चोरी, यावल पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांची तक्रार
Yawal, Jalgaon | Sep 19, 2025 यावल तालुक्यात नायगाव हे गाव आहे. या गावाच्या शेतशिवारामध्ये सागर गुणवंतराव देशमुख यांच्या शेतातून ताडपत्री दिलीप पाटील यांच्या शेतातील केबल विनेश देशमुख यांचे शेतातील केबलसह स्टार्टर व विविध साहित्य चोरी झाले आहे. शेतातील साहित्य चोरी झाल्याने शेतकऱ्यांनी यावल पोलीस ठाणे गाठले व यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.