नागपूर शहर: तहसील पोलिसांची मोठी कारवाई; 'सर्किट'वरील खुनी हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक : संदीप मेंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप मेंढे यांनी 18 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या वादातून मोहम्मद इश्तियाक उर्फ 'सर्किट'यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीतील ४ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हे पीडित यांच्याकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून दारू पीत असत. या त्रासाला विरोध केल्यामुळे त्यांच्यात वाद वाढला होता. याच रागातून आरोपींनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी पान्याने इश्तियाक यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर ज