नागपूर शहर: ओसीडब्ल्यूच्या निष्काळजीपणामुळे चिमुकली उघड्या चेंबरमध्ये कोसळली; नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
शहरातील उत्तर नागपूर भागातील मोहम्मद रफीक चौकात रविवारी सायंकाळी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'ऑरेंज सिटी वॉटर' कडून सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी खबरदारी न घेतल्यामुळे, सुमारे २ ते ३ वर्षांची एक चिमुकली उघड्या असलेल्या खोल चेंबरमध्ये कोसळली. सुदैवाने, आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तत्काळ धाव घेतल्याने या मुलीचा जीव वाचला आहे. ही घटना झाल्यामुळे नागरिकांनी अत्यंत रोष व्यक्त केला आहे.