नागपूर शहर: स्नॅपचॅटवरील मैत्री पडली महागात; लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार: संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 20 एप्रिल ला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.