नागपूर शहर: यशोधरानगरात जुगार अड्ड्यावर धाड; तिघे अटकेत
28 जूनला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोळा मैदान परिसरात जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत ३ जणांना अटक करण्यात आली असून, ५८,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.