कुणाल ढेपे मार्गावरील ओसवाल पेट्रोल पंपाजवळ भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अचलपूर येथील भाजीपाला अडत व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास घडली.या अपघातात संतोष सीताराम गौर (वय ४५,रा.बुंदेलपुरा, अचलपूर) यांचा मृत्यू झाला आहे. संतोष गौर हे नेहमीप्रमाणे अचलपूर येथून परतवाडा येथील भाजीपाला अडतमध्ये दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली.