मोर्शी: चारचाकी वाहनातून गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनावर, तळणीफाट्यावर कारवाई करून आरोपी मोर्शी पोलिसांच्या ताब्यात
आज दिनांक दोन नोव्हेंबरला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोर्शी पोलीस स्टेशनच्या परिसरात तळणी फाट्यादरम्यान दिनांक एक नोव्हेंबरला दुपारी तीन ते चार वाजता च्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना टाटा झेस्ट वाहनातून, चार गोवंशाची वाहतूक होताना आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने वाहनाची तपासणी करून चार लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला मोर्शी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास मोर्शी पोलिसांकडून सुरू आहे