नागपूर शहर: इंधन दरवाढीविरोधात नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आक्रमक आंदोलन
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) नागपुरात आक्रमक आंदोलन केले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य 'सायकल मार्च काढण्यात आला.