नागपूर शहर: पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक: स्वप्निल राऊत पोलीस उपनिरीक्षक वाठोडा
वाठोडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राऊत यांनी 2 जून ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार,वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असलेल्या एका बीट मार्शल पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी तत्परता दाखवत एका कुख्यात आरोपीला अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राऊत यांनी दिली आहे.