गेवराई: मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप
Georai, Beed | Nov 7, 2025 धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. या आरोपांनुसार, धनंजय मुंडे यांचे पीए कांचन यांनी काही व्यक्तींना घेऊन परळी येथे नेले असून, तिथे एका बैठकीदरम्यान आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. माहितीनुसार, या बैठकीत "जे लागेल ते देतो" अशा शब्दांत अडीच कोटी रुपयांपर्यंतची डील ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वीही ५ ते ६ कोटी खर्च झाल्याचा उल्लेख करण्यात आला. या सर्व गोष्टी धनंजय मुंडे यांच्या माहितीतून झाल्याचा आरोप करण्यात आला.