नागपूर शहर: प्रताप नगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल; २.४५ लाखांचा मुद्देमाल लंपास
17 मे ला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाषनगर, कामगार कॉलनी भागात एका घरातून भरदिवसा २ लाख ४५ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.फिर्यादी ६० वर्षीय रत्नमाला धर्मदास मेश्राम या आपल्या मुलीला उपचारासाठी डॉक्टर पडोळे हॉस्पिटल येथे घेऊन गेल्या होत्या. त्यांनी घराचे दार फक्त लोटून ठेवले होते. याचा फायदा घेऊन एका अज्ञात चोराने घरात प्रवेश केला. घरात ठेवलेल्या चावीनेच लोखंडी कपाट उघडून चोराने १,०५,००० रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकू