होय, आपण गर्भाशय मुखाच्या कर्करोगा पासून संरक्षण करू शकतो- मा. बी आर खरात शिक्षणाधिकारी.
3.9k views | Jalna, Maharashtra | Mar 23, 2026 जालना दि.२३/३/२६ मा. बी आर खरात शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना यांनी एचपीव्ही लसीकरण बाबत आव्हान केले. 14 वर्षे पूर्ण व 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. या लसीमुळे गर्भाशयाच्या मुख कर्करोगापासून संरक्षण मिळते व होय, आपण गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करू शकतो असा विश्वास आपल्या आव्हानाद्वारे व्यक्त केला.