कुसुम -कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान- कुष्ठरुग्णांकरिता विशेष सर्वेक्षण मोहीम -30 ते 13 फेब्रुवारी 2026 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. ३० जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने कुष्ठरोग निर्मूलनासाठी दि. ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान स्पर्श जनजागृती अभियान सुद्धा राबविण्यात येणार असून, जनजागृती व लोकसहभागासाठी भंडारा जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. “भेदभाव समाप्त करू या, सन्मानाची वागणूक देऊ या” हे स्पर्श जनजागृती मोहीम २०२६ चे घोषवाक्य आहे