तळा: तळा तालुक्यात वीज पडून मुलाचा मृत्यू
Tala, Raigad | May 10, 2026 रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि.९) अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक तालुक्यांना झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि घरांचे नुकसान होण्याच्या घटना घडल्या. तळा तालुक्यात वीज कोसळून १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.