नाशिक: गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने चामार लेणी, बोरगड येथे केली अटक
Nashik, Nashik | Sep 15, 2025 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला खंडणी विरोधी पथकाने चामार लेणी, बोरगड येथे ताब्यात घेतले आहे.खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत दरोड्याचा प्रयत्न करून पाच महिन्यांपासून फरार असलेला सुरज उर्फ चाऱ्या निवृत्ती चारोस्कर हा चामार लेणी,बोरगड, मखमलाबाद लिंक रोडवर फिरताना आढळून आला आहे.सदर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासासाठी म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.