खालापूर: खालापूर पंचायत समितीचे आरक्षण पंचायत समितीच्या सभागृहात सोडत पद्धतीने जाहीर
खालापूर पंचायत समितीच्या आठ गणांचे आरक्षण आज सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० च्या सुमारास पंचायत समितीच्या सभागृहात सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले. खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण आणि पुरवठा उपजिल्हा अधिकारी यांच्या देखरेखीखाली दोन शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे ही सोडत काढण्यात आली. खालापूर पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण खुले जाहीर झाले आहे, त्यामुळे अनेक इच्छुकांना सभापतीपदाची स्वप्ने पडली होती. मात्र, आज जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षणाने अनेक प्रस्थापित, आर्थिक प्रस्थ आणि इच्छुक दावेदार यांच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे.