एरंडोल: उत्राण येथील नीलोन्स कंपनीच्या गेट समोर वाळू चोरी करून येताना ट्रॅक्टर पकडले, एका विरुद्ध कासोदा पोलिसात गुन्हा दाखल.
एरंडोल तालुक्यात उत्राण हे गाव आहे. या गावात नीलोन्स कंपनी आहे. या कंपनीच्या गेट समोरून रवींद्र भारती हे ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.५४ बी.१८४६ याला ट्रॉली जोडून तो वाळू चोरी करून येत होता. हा प्रकार महसूलच्या पथकाच्या निदर्शनास आला तेव्हा याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.