7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन आरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड येथे उत्साहात साजरा
1.5k views | Beed, Maharashtra | Apr 7, 2026 आज दिनांक 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य विभागात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. बीड डॉ. उल्हास गंडाळ सर हे होते कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्शन केले जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य "एकत्रित प्रयत्न आरोग्य साठी,विज्ञानाची साथ भविष्यासाठी" हे असल्यामुळे या घोषवाक्यावर आपले विचार व्यक्त केले.