धामणगाव रेल्वे: तळेगाव दशासर येथे रस्ता अडवून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
तळेगाव दशासर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक नोव्हेंबरला बेकायदेशीर जमाव जमवून रहदारीच्या रस्त्यावर बसून वाहने अडवल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत तळेगाव दशासर पोलिसांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप , . पंकज वानखडे , श्रीकांत गावंडे दीपक भगत, अनिता मेश्राम नितीन गोंडाने, आबेद खान अहमद खान व इतर आणखी अशा एकूण 21 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दशासर बस स्टँड ते संभाजीनगर कडे जाणारा महामार्ग क्रमांक 723 येथे बेकायदेशीर जमाव जमवुन जिल्हाधिकारी अमरावती....