देवळी: देवळी-पुलगाव भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी रणशिंग फूकले;आमदार राजेश बकाने यांच्या नेतृत्वाखाली व्यापक आढाव
Deoli, Wardha | Nov 1, 2025 देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता शिगेला पोहोचली आहे.भारतीय जनता पक्षाने आपली संघटनशक्ती मजबूत करण्यासाठी आमदार राजेश बकाने यांच्या नेतृत्वाखाली व्यापक आढावा मोहिम सुरू केली आहे.पुलगाव आणि देवळी नगरपरिषदेसह जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रांतील प्रभाग आणि गणनिहाय महत्त्वाच्या बैठका नुकत्याच संपन्न झाल्याचे आज 1 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता प्रसिद्धस दिले.