जळगाव जामोद तालुक्यातील गोराळा धरण ते सुनगाव रस्त्यावर दुचाकीचा अपघात होऊन त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. जामोद येथील रहिवासी विवेक वसंता भगत व गौरव देविदास बांधीलकर हे दोघे मोटरसायकलने गोराळा धरणावरून सुनगाव कडे येत असताना त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.