यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे उमरखेड येथील ८ खाटांच्या मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.यामुळे उमरखेड आणि लगतच्या परिसरातील किडनी (मूत्रपिंड) आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध होणार असल्याने दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.