बोदवड: कुंड शिवारातून शेत गट क्रमांक ८ च्या बांधावर लावलेली मोटरसायकल चोरी, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Bodvad, Jalgaon | Oct 14, 2025 कुंड शेत शिवारात शेत गट क्रमांक ८ आहे. या शेताच्या बांधावर प्रशांत सुभाष देशमुख वय ३८ यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ ई.बी.३५०४ ही लावली होती तेव्हा तेथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची ही मोटरसायकल चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आल्याने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.