उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड लहरींचा जोर आता राज्यातही वाढताना दिसतोय. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यासह गोळेगाव परिसरात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून, यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. गोळेगाव परिसरात किमान तापमान थेट ५.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून, मागील पंधरा दिवसांपासून पहाटे दव आणि धुक्याचे प्रमाण वाढले आहे. याचा थेट परिणाम शेतीवर होताना दिसतोय. द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात बागांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी शेकोट्या पेटवून