भंडारा तालुक्यातील बेलगाव येथे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. ४ नोव्हेंबर रोजी अवैध दारू गाळप अड्ड्यावर कारधा पोलिसांनी धाड घातली असता आरोपी ताराचंद केवट वय ४३ वर्षे रा. बेलगाव याच्या ताब्यातून मातीच्या मडक्यांमध्ये २५० किलोग्राम सडवा मोहपास, ५ मातीचे मडके, ५० किलो जलाऊ काड्या व दारू गाळण्याचे विविध साहित्य एकूण किंमत ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा कारधा पोलिसांनी तपासात घेतला आहे.