अलिबाग: अलिबागमध्ये सिव्हील रुग्णालयात स्लॅब कोसळला
Alibag, Raigad | Jul 1, 2026 अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका भागातील स्लॅब अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने त्या वेळी संबंधित ठिकाणी कोणताही रुग्ण, नातेवाईक किंवा कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.