वर्धा: लाडकी बहीण योजनेतील E-KYC अडचणींमुळे पात्र महिला लाभापासून वंचित
Wardha, Wardha | Jan 21, 2026 लाडकी बहीण योजनेतील E-KYC अडचणींमुळे पात्र महिला लाभापासून वंचित देवळी–पुलगाव विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना E-KYC प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश बकाने यांनी सदर विषयाची तातडीने दखल घेण्याची मागणी शासनाकडे केली आहे.