वाशिम: फटाक्यांच्या दरवाढीमुळे वाशिम फटाका बाजारात विक्रीत घट ग्राहकांचा प्रतिसाद मंदावल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता
Washim, Washim | Oct 18, 2025 दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाच वाशिमची फटाका बाजार सजली असली तरी ग्राहकांची फारशी गर्दी दिसत नाहीये. अतिवृष्टी आणि फटाक्यांच्या दरवाढीमुळे यंदा विक्रीत घट दिसून येत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.फटाक्यांचे दर वाढले असले तरी बाजारात यंदा काही नवीन आकर्षक फटाके दाखल झाले आहेत. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद मंदावल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे...