तुमसर तालुक्यातील सितासावंगी येथील रहिवासी असलेले शिवप्रसाद बनवारी सोनकलीहारी (वय ५७) यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. या घटनेची नोंद गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. मृतक शिवप्रसाद सोनकलीहारी यांना हृदयविकाराचा त्रास जाणवत होता. त्यांना तातडीने उपचारासाठी सुभाष चंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूचे आवश्यक कागदपत्रे व माहिती गोबरव