नागपूर शहर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरापासून अवघ्या दीडशे मीटर अंतरावर पेट्रोल मध्ये इथेनॉल मिश्रणाविरोधात आपचे आंदोलन
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा दावा करत, आम आदमी पक्षाने नागपुरात तीव्र आंदोलन केले. आंदोलकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली.