नागपूर शहर: महिलेला साक्ष देऊ नको म्हणत धमकावणाऱ्या आरोपीला बेड्या; जसवंत पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक
इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जसवंत पाटील यांनी 21 जूनला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचा खून करून आरोपी जेलमध्ये गेले त्यानंतर जेलमधून सुटून आल्यानंतर त्याच्या पत्नीला साक्ष देऊ नको म्हणून धमकावणाऱ्या आरोपींना पुन्हा एकदा इमामवाडा पोलिसांनी अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जसवंत पाटील यांनी दिली आहे