नागपूर शहर: सावधान! ऑटो रिक्षाने घरी येत असताना लाखो रुपयांचा मुद्देमाल असलेली पर्स चोरी हुडकेश्वर ठाण्यात गुन्हा दाखल
26 एप्रिल ला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीतील अध्यापक नगर येथे राहणाऱ्या साधना बालपांडे या गावावरून परत येत असताना संत्रा मार्केट गेट येथे उतरून घरी जाण्याकरिता ऑटो रिक्षा ने घरी जात असताना बैद्यनाथ चौकातून दोन अनोळखी महिला या यात बसल्या. या आरोपींनी साधना यांच्या पर्समध्ये असलेली छोटी पर्स ज्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सात लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल होता ती चोरून नेली.