लातूर: लातूरसह आठ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Latur, Latur | Nov 2, 2025 लातूर, दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार पुढील ३ तासांत, म्हणजेच रात्री १० ते पहाटे १ वाजेपर्यंत, लातूर जिल्ह्यासह पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळेत वीजांच्या कडकडाटासह काही भागांत अल्पकालीन जोरदार सरींची शक्यता असून, रस्त्यांवर पाणी