सेनगाव: कडोळी येथे भारतरत्न नानाजी देशमुख यांना विनम्र अभिवादन
सेनगांव तालुक्यातील कडोळी या ठिकाणी आज भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. आज दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वाजता कडोळी या ठिकाणी भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते मारोती गीते, शशिकांत देशमुख,सामाजिक कार्यकर्ते वसंतराव अवचार पत्रकार शिवा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.