सुधागड: हिरव्यागार गावरान कच्च्या कैऱ्यांनी बाजारफुलला
सुधागड गावरान कच्च्या कैऱ्या तसेच आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील बाजारापेठांमध्ये गावरान कैऱ्या व गावरान आंबे विक्रिसाठी आले आहेत. मात्र यंदा अवकाळीचा फटका व प्रतिकूल हवामान यामुळे आवक कमी आहे. परिणामी भाव वाढले आहेत. मागच्या वर्षी 50 रुपयांना पाच ते सहा कैऱ्या असलेला एक वाटा आता 80 ते शंभर रुपयांना मिळत आहे. तर पिकलेल्या गावरान आंब्याचा भाव डजनाला चारशे ते सहाशे रुपये आहे. भाव वाढले असले तरी या कैऱ्या खरेदीसाठी ग्राहक मोठी गर्दि करत आहेत.