नागपूर शहर: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांच्या विरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन, जाळण्यात आला प्रतीकात्मक पुतळा
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. नागपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सरमा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.