वाशिम: 'आपत्ती धोके निवारण दिना’निमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा संपन्न
Washim, Washim | Oct 13, 2025 'आपत्ती धोके निवारण दिना’निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा संपन्न वाशिम, दि. १३ ऑक्टोबर (जिमाका): संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार दरवर्षी १३ ऑक्टोबर हा दिवस ‘आपत्ती धोके निवारण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आज दि.१३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध