भूम: भूममधून 78 हजारांच्या 10 बोकड व 7 पाट्या चोरीचा प्रकार उघड
भूम शहरातील लक्ष्मीनगर येथील आस्लम जिकरे यांच्या शेळीपालन शेडमधून 78 हजार रुपये किमतीचे 10 बोकड आणि 7 पाट्या चोरी झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली गेली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.