तुमसर: डोंगरी बुजूर्ग येथे अवैध रेती वाहतूक करणारा मिनी ट्रक महसूल पथकाच्या ताब्यात, 10 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग येथे दि. 15 ऑक्टोंबर रोज बुधवारला सकाळी 8 वा.च्या सुमारास आंधळगाव महसूल पथकाचे मंडळ अधिकारी आशिष टेकाम हे आपल्या पथकासह गौण खनिज संबंधाने गस्तीवर असताना त्यांना मिनी ट्रक क्र. MH 36 AA 4683 यात विनापरवाना 2 ब्रास रेती वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.यावेळी महसूल पथकाने सदर मिनी ट्रक व 2 ब्रास रेती असा एकूण 10 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून घटनेची नोंद आंधळगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे.