सुधागड: पालीतील डम्पिंग ग्राऊंड प्रदूषणाच्या विळख्यात
पाली न.पं.च्या हद्दीतील टेंबी परिसरातील डम्पिंग ग्राऊंड सध्या गंभीर प्रदूषणाचा केंद्रबिंदू बनला असून येथील धुसमसणारा कचरा, पसरलेली दुर्गंधी आणि विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून कचऱ्याचे ढिगारे वाढत चालले असून ओला व सुका कचरा एकत्र टाकला जात असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.