म्हसळा: म्हसळा तालुक्यातून एक वृद्ध तर एक महिला आपल्या मुलीसोबत बेपत्ता : दिसल्यास म्हसळा पोलिसांना कळवण्याचे आवाहन
Mhasla, Raigad | Aug 6, 2025 म्हसळा तालुक्यातून धक्कादायक वृत्त समोर आले असून एक वृद्ध महिला तर एक गृहिणी महिला आपल्या मुलीसोबत बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. निर्मला महादेव पवार वय 76 वर्षे ही वृद्ध महिला मौजे तोराडी आदिवासी वाडी येथून बेपत्ता झाली असून तिझे वर्णन रंग गोरा,सडपातळ, उंची 150 सेंटीमीटर, अंगावर पांढऱ्या रंगाची साडी घातली असून ती 29 जुलै पासून बेपत्ता आहे.