नागपूर शहर: नागपुरात 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत कारवाई; एम.डी. ड्रग्जसह एकाला अटक, दुसरा फरार: प्रमोद चौधरी पोलीस निरीक्षक
जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी यांनी 26 मे ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत जरीपटका पोलिसांनी एका मोठ्या अंमली पदार्थ तस्कराचा डाव उधळून लावला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जरीपटका भागात मोपेडवर उभ्या असलेल्या संशयिताला पकडले, मात्र त्याचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. बद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी यांनी दिली आहे.