नागपूर शहर: ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीदरम्यान वीज शॉक लागून इलेक्ट्रिशियनचा मृत्यू: जितेंद्र बोबडे, पोलीस निरीक्षक
पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांनी 7 जूनला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रान्सफॉर्मर खराब झाला होता. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी तीन लोकांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने इलेक्ट्रिशियन अजय अरविंद हाडके यांना जोरदार विजेचा शॉक लागला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांनी दिली आहे.