गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुर्लेवाडी येथे तराफ्याच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा व वाहतूक केल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने गंगाखेड पोलीस पथकाने शनिवार १३ डिसेंबर रोजी खुर्लेवाडी येथील गोदावरी नदीपात्रात छापा मारून अवैध वाळू उपस्यासाठी नदी पात्रात असलेले दोन तराफे जाळून नष्ट करत अवैधरित्या उपसा करून ठेवलेल्या पन्नास ब्रास पेक्षा अधिक वाळूचे साठे जप्त करून पालम तहसील कार्यालयाचे महसूल सेवक व खुर्लेवाडी पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिले.