नागपूर शहर: 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी उघड; १.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
2 जूनला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार जरीपटका पोलिसांनी नारा गावातून आयुष उर्फ चांदी अमृत मेश्राम या तरुणाला १३ ग्रॅम एम.डी. अमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे.जप्त केलेल्या मोबाइल आणि एम.डी.ची एकूण किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे. आरोपीने चौकशीत मजहर अली, प्रथम डोंगरे, आदर्श मिश्रा आणि सरफराज शेख या चार साथीदारांच्या मदतीने हे अमली पदार्थ आणल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, फरार साथीदारांचा शोध सुरु आहे.