समुद्रपूर: गिरड येथील अनुसया माता महिला भजन मंडळाच्या वतीने श्री.जगन्नाथ स्वामी मंदीर परिसरात ११ वटवृक्षा वृक्षारोपण
समुद्रपुर :गिरड येथील श्री अनुसया माता महीला भजन मंडळाच्या वतीने शुक्रवारी १ वाजता श्री.जगन्नाथ स्वामी मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून प्रत्येकाने वृक्ष रोपण केले पाहिजे. शिवाय घर परिसरात हिरवळ निर्माण केल्यास वाढत्या तापमानापासून संरक्षण मिळेल यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. असे मत मंडळाच्या अध्यक्षा अविता दरणे यांनी उपस्थिती महिलांना मार्गदर्शन करितांना सांगितले.बचत गटातील सदस्यांनी ११ वटवृक्ष रोपण केले.