नागपूर शहर: नागपूर गुन्हे शाखेची कारवाई; अमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपी जेरबंद
17 एप्रिल ला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहराच्या गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत एका फरार आरोपीला ताब्यात घेतले आहे.नमो बंडू मेश्राम असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी लकडगंज पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात पोलिसांना हवा होता.गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.